Home » जळगाव » प्रा.डॉ. योगेश चौधरी यांना सायन्स अँड टेक्नोलॉजी विषयात पीएचडी प्राप्त

प्रा.डॉ. योगेश चौधरी यांना सायन्स अँड टेक्नोलॉजी विषयात पीएचडी प्राप्त

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटी चे इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च येथील प्रा.योगेश नारायण चौधरी यांनी कॉम्प्यूटर सायन्स (सायन्स अँड टेक्नोलॉजी) मध्ये नुकतीच पीएचडी पूर्ण केली आहे. त्यांनी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे पीएचडीसाठी नोंदणी केली होती. प्रा.डॉ.बी.एच. बऱ्हाटे व्हॉइस प्रिंसिपल भुसावळ आर्ट्स सायन्स पी.ओ. नाहाटा कॉमर्स कॉलेज भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली चौधरी यांनी पीएचडी पूर्ण केली. त्यांनी ‘इफेक्टिव टेक्स्ट स्टेगनोग्राफीक मेकॅनिझम युझिंग न्यूमरिकल एनकोडिंग’ (माहिती सुरक्षितता) या विषयावर शोधनिबंध सादर केला आहे. त्यांचे पीएचडी कार्य माहिती सुरक्षित पद्धतीने देवाण घेवाण करण्यासाठी उपयुक्त राहील.

माहिती सुरक्षितता (इन्फॉर्मेशन हायडिंग) हे आता सध्याच्या युगात खूप महत्वाचे क्षेत्र असल्यामुळे या शोध निबंधामध्ये सादर केलेल्या पध्दतीने आपला मेसेज (इंग्लिश टेक्स्ट कम्युनिकेशन) हे शॉर्ट मेसेजिंग सर्व्हिसेस (एसएमएस) स्वरुपात मोबाईल टू मोबाईल सुरक्षित पद्धतीने पाठवता येईल. यामुळे माहितीची देवाण घेवाण करण्याऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त हा संदेश कोणीच वाचू शकणार नाही.

कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते चौधरी यांना पीएचडी प्रदान करण्यात आली. योगेश चौधरी यांना केसीई संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चचे संचालक प्रोफेसर बी.व्ही. पवार, माजी संचालक प्रोफेसर शिल्पा बेंडाळे यांचे देखील मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!