जळगाव ( वास्तव पोस्ट) : MRSAC आणि महाराष्ट्र राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विविध नैसर्गिक आपत्ती मध्ये शेतपिकांचे/ जमिनीचे, जनावरांचे, घरांचे, गोठ्यांचे झालेल्या नुकसानीचे शेतकऱ्यांना जलद तसेच पारदर्शक, आणि वस्तुनिष्ठ भरपाई मिळण्यासाठी ई-पंचनामा हे अत्यंत उपयोगी ॲप विकसित करण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने तहसील कार्यालय यावल येथे तलाठी, मंडळ अधिकारी, नैसर्गिक आपत्ती संकलनाचे महसूल सहाय्यक यांना प्रशिक्षण देण्यात आले. तहसिलदार यावल मोहनमाला नाझीरकर यांनी जिल्ह्यात सर्वप्रथम ई-पंचनामा या पोर्टलविषयक कार्यवाही पूर्ण केली आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीचे पंचनामे विषयक कार्यवाही हे ई-पंचनामा या ॲप द्वारेच पूर्ण करण्यात येणार असल्याचे समजते.
