जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आज दि.१४ रोजी के.सी.ई. चे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये रोटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ पार पडला. याप्रसंगी रो प्रा. पुनम मानुधने आयएमआर चे डायरेक्टर प्रा.डॉ. बी.व्ही. पवार तसेच रोटरी अध्यक्ष ॲड सागर चित्रे सचिव पराग अग्रवाल आणि प्रोजेक्ट चेअरपर्सन डॉ. शमा सुबोध, डॉ. ममता दहाड, डॉ. पराग नारखेडे उपस्थित होते.
यावेळी रोटरॅक्ट अध्यक्ष म्हणून डॉ. धनश्री चौधरी तर सचिवपदी यामिनी भाटिया यांनी पदभार स्वीकारला. तसेच उपाध्यक्ष सौरभ माळी, सह सचिव हिमानी शर्मा तर बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून कार्तिक पाटील, चेतना पाटील, प्रज्ञा पाटील, तन्वी वाघ, मयुर बडगुजर, गायत्री भोईटे, भुमिका पाटिल, निधी वर्मा, खुशी ललवाणी, तुषार मखीजा, राज ललवाणी त्यांनी पदभार स्वीकारला.
याप्रसंगी रो. सुभाष अमळनेरकर, रो सुबोध सराफ, रो जयेश ठाकुर, रो रितेश जैन, रो पंकज व्यवहारे, रो श्याम अग्रवाल, रो अँड भोकरीकर, उपस्थित होते. याप्रसंगी डायरेक्टर प्रा.डॉ.बी.व्ही. पवार, रोटरी अध्यक्ष ॲड सागर चित्रे,, रोटरॅक्ट अध्यक्ष डॉ. धनश्री चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. तर आभार यामिनी भाटिया हिने मानले.
