Home » जळगाव » के.सी.ई. सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात आकाश कंदील स्पर्धा

के.सी.ई. सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात आकाश कंदील स्पर्धा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात आकाश कंदील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे आयोजन व नेतृत्व प्रा. कोमल जैन यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुगंधी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आयोजित केली.

या कार्यक्रमात डॉ. संजय सुगंधी यांनी सांगितले कि दिवाळी भारतीय सण परंपरेतील मोठा सण. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा व आनंदाचा उत्सव. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचं प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने जीवनाचा अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव २०२४ समृद्धीचा व कृतज्ञतेचा सोहळा आहे.

यावेळी कार्यक्रमात जवळपास १५० विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात पाच पारितोषिक देण्यात आली. कार्यक्रमात प्रा.कोमल जैन, प्रा.डिगंबर सोनवणे, प्रा. तानिया भाटिया, प्रा.मकरंद गोडबोले यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे परीक्षक अकॅडमिक डीन डॉ.प्रज्ञा विखार व समन्वयक डॉ.सी.एस. पाटील यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!