Home » महाराष्ट्र » नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टीची यशस्वी चाचणी ; मार्च २०२५ पर्यंत प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टीची यशस्वी चाचणी ; मार्च २०२५ पर्यंत प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : भारतीय वायुदलातर्फे झालेल्या ‘सी-२९५ एअरक्राफ्ट’चे लॅंडींग व ‘सुखोई-३० एअरक्राफ्ट’चे फ्लायपास्ट आज नवी मुंबई विमानतळ येथे यशस्वीपणे पार पडले. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. यावेळी गांधीनगरहून आलेल्या सी-२९५ विमानावार पाण्याचा फवारा मारत अनोखी सलामी देण्यात आली. तसेच लँडींग करणाऱ्या सी-२९५ विमानाच्या वैमानिकाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सन्मानदेखील केला.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात असून, ते मार्च २०२५ पर्यंत प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु होईल. दरवर्षी अंदाजे ९कोटी प्रवासी या विमानतळावरून प्रवास करतील. हे विमानतळ शिवडी न्हावाशेवा सी-लिंक, मुंबई तसेच नवी मुंबई मेट्रो, दोन खाडी मार्गाने जोडले जात असून, हा देशातील एक विशेष प्रकल्प ठरणार आहे.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खा. श्रीरंग आप्पा बारणे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, खा. नरेश म्हस्के, खा. सुनील तटकरे, आ.संजय शिरसाट, तसेच वायुदलाचे वरिष्ठअधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!