Headlines
Home » सांस्कृतिक » वा.रा.सोनार ग्रंथ दालनात मतदार जागृती, ग्रंथ विक्री आणि निवडणूक विषयक प्रदर्शन दालनाचं उद्धाटन

वा.रा.सोनार ग्रंथ दालनात मतदार जागृती, ग्रंथ विक्री आणि निवडणूक विषयक प्रदर्शन दालनाचं उद्धाटन

अमळनेर दि. २ ( प्रतिनिधी )– अमळनेर इथं सुरु असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वा.रा.सोनार ग्रंथ दालनात उभारलेल्या, मतदार जागृती, ग्रंथ विक्री आणि निवडणूक विषयक प्रदर्शन दालनाचं आज सकाळी वैशाली बोरसे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, सावखेडा, अमळनेर यांच्या हस्ते उद्घाटन झालं.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, तसंच संमेलनात कार्यालयाच्या वतीनं आयोजीत ‘तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान’ या विषयावरील परिसंवादातील वक्ते बिंदुमाधव खिरे, शमिभा पाटील, विजया वसावे, प्रूनीत्त गौडा, डैनियल्ला मॅक्डोन्सा आणि प्राध्यापक डॉ. दीपक पवार हे मान्यवर यावेळी उपस्थीत होते. मान्यवरांनी सर्व दालनांना तसंच अहिराणी भाषेतील मतदार जागृतीपर मीम्स वॉलला भेट दिली. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीपर पथनाट्य आणि निवडणूक गीतावरील नृत्य सादर केलं.

One thought on “वा.रा.सोनार ग्रंथ दालनात मतदार जागृती, ग्रंथ विक्री आणि निवडणूक विषयक प्रदर्शन दालनाचं उद्धाटन

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!