जळगाव ( वास्तव पोस्ट ) : करियर कट्टा, विद्यार्थी विकास विभाग व इव्हेंट मॅनेजमेंट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मू.जे. महाविद्यालय मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासाठी भव्य आरोग्य शिबिर २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन डॉ हर्षवर्धन जावळे (संचालक के सी ई सोसायटी) यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सं.ना. भारंबे होते. या भव्य आरोग्य शिबिरात डॉ. जगदीश बोरोले (जनरल सर्जन), डॉ.अतुल भारंबे (कॅन्सर तज्ञ), डॉ.अनुप येवले (नेत्ररोग तज्ञ), डॉ.पंकज पाटील (फिजीशियन अँड सर्जन), डॉ.नितीन धांडे (ऑर्थोपेडीक सर्जन), डॉ.रूपाली बेंडाळे (स्त्रीरोग तज्ञ), डॉ.जूही पाटील- भोळे (डेंटल तज्ञ), डॉ.हर्षदा पाटील (आयुर्वेदिक व पंचकर्म), डॉ.प्राजक्ता जावळे (पेन व भुलशास्त्र तज्ञ) या नामवंत डॉक्टरांची उपस्थिती होती.
महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी डॉ.प्रा. भूपेंद्र केसुर, प्रा. आरसीवाला, प्रा. राजीव पवार व विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. मनोज महाजन यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इव्हेंट विभागाचे पंकज कासार व सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन प्रा. गोपीचंद धनगर यांनी केले.
