जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ‘दीक्षारंभ’ या संकल्पनेतून नवीन सभागृहात विविध कार्यक्रम झालेत. प्रारंभी नवप्रवेशित विद्यार्थी व पालक यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सं.ना.भारंबे, शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे यांच्या हस्ते झाले. व्यवस्थापन शाखेच्या प्रा.कोमल जैन यांनी डॉ. सं.ना.भारंबे यांच्या कार्याचा परिचय करुन दिला. प्राचार्य डॉ.भारंबे यांनी विद्यार्थ्यांना ‘दीक्षारंभ’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला. तसेच मूल्यधारित शिक्षण व नवीन शैक्षणिक धोरण २०२० या विषयी माहिती दिली.

व्यवस्थापन शाखेचे विभाग प्रमुख प्रा.हर्षा देशमुख यांनी प्राचार्य डॉ.अशोक राणे यांच्या कार्याचा परिचय करुन दिला. प्राचार्य डॉ. राणे यांनी ‘कौशल्य विकास शिक्षण’ या विषयी मार्गदर्शन केले. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहेत. त्यामुळे सातत्याने नवनवीन शिकण्याची प्रक्रिया कधी संपत नाही, असे मत व्यक्त केले. अभ्यासेत्तर कार्यक्रमातही सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.संजय सुगंधी यांनी विद्यार्थ्यांना केले.
◆ मूक नाटकास उत्तम प्रतिसाद
महाविद्यालयाच्या अकॅडेमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार यांनी महाविद्यालयाची माहिती व उपलब्ध सोयी सुविधा व इतर उपक्रम या विषयी माहिती दिली. श्वेता चौधरी व ग्रुप ने ‘समाजात वाढलेला स्वैराचार कसा रोखता येईल’ या विषयी मूकनाटक सादर केले. त्यास उत्तम प्रतिसाद लाभला.
दरम्यान एकलव्य क्रीडा संकुल, मनभावन एफएम रेडिओ स्टेशन भेट, अँटीरॅगिंग, योग शिक्षण, प्रयोगातून विज्ञान यात प्रात्यक्षिकाद्वारे विज्ञान, सॉफ्ट स्किल, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, सवांद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची ओळख अशा विविध विषयांबाबात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे, असेही या वेळी सांगण्यात आले.
या वेळी प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, अकॅडमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार, प्रा.हर्षा देशमुख, प्रा.कोमल जैन, डॉ.वीणा भोसले, प्रा.दर्शन ठाकूर, प्रा.अविनाश सूर्यवंशी, प्रा.प्रसाद कुलकर्णी, प्रा.राहुल पटेल, प्रा.लीना वाघुळदे, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.पूजा मराठे यांनी केले. आभार प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा.के बी पाटील यांनी मानले.
