Home » जळगाव » भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा वॉरियर्स शाखेचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या हस्ते उद्घाटन

भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा वॉरियर्स शाखेचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या हस्ते उद्घाटन

चाळीसगांव ( वास्तव पोस्ट ) : भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे हे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्याहस्ते दहीवद, मेहुणबारे, भोरस येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा वॉरियर्स शाखेचे जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनुप मोरे यांच्यासोबत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान अनुप मोरे यांनी चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन केले. तसेच चाळीसगावच्या एकदंत व महावीर मित्र मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेतले.

यावेळी युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस योगेश मेंद, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा भैरवी वाघ, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किरण बोऱ्हाडे, शुभम गाडे, भाजपा जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस भावेश कोठावदे, ग्रामीण मंडल अध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहर मंडल अध्यक्ष नितीन पाटील, युवा मोर्चा ग्रामीण मंडळ अध्यक्ष गोरख राठोड, युवा मोर्चा शहर मंडळ अध्यक्ष मनोज गोसावी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!