Headlines
Home » राष्ट्रीय » वादग्रस्त IAS पूजा खेडकरला केंद्र सरकारचा दणका ! सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश

वादग्रस्त IAS पूजा खेडकरला केंद्र सरकारचा दणका ! सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र देऊन IAS झालेल्या पूजा खेडकर यांची केंद्र सरकारने हकालपट्टी केली आहे. यामुळे पूजा यांना मोठा धक्का बसला आहे. आदेशानुसार केंद्र सरकारने पूजा खेडकर हिला IAS प्रोबेशनर प्रशासकीय सेवेतून तात्काळ कार्यमुक्त केले आहे. माजी IAS अधिकारी पूजा खेडकर बनावट कागदपत्रे प्रकरण देशभर चर्चेचा विषय ठरला.

खोटी कागदपत्र सादर केल्याने पूजा खेडकर चांगल्याच अडचणीत आल्या होत्या. अखेरीस केंद्र सरकारने कारवाई केली आहे. तीन दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयात आणखी एक रिपोर्ट दाखल केला होता. यात पूजा खेडकरने सादर केलेली दिव्यांग असल्याची प्रमाणपत्रे खोटी असल्याचे स्पष्ट केले. पूजा खेडकरने सिव्हिल सेवा परीक्षा २०२२ आणि २०२३ च्या परीक्षेत दोन दिव्यांग प्रमाणपत्र सादर केली होती. मेडिकल अथॉरिटी अहमदनगर महाराष्ट्र यांनी ती जारी केली होती.

खेडकरने दिव्यांग प्रमाणपत्रांचा वापर करून युपीएससीच्या निवडीत विशेष सवलत मिळवली होती. कमी गुण मिळाल्यानंतरही तिला दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सूट मिळाल्याने उत्तीर्ण होता आले. पूजाने ८४१ रँक मिळवली होती. मात्र शेवटी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तिची प्रमाणपत्रे खोटी असल्याचे न्यायालयाच्या उघडकीस आणून दिले.

दरम्यान आयएएस, आयपीएस अधिकाऱ्याला दोन वर्षांचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण लागतो. या काळात संबंधित अधिकाऱ्यांना विविध विभागांमध्ये काम करावे लागते. त्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते. IAS असलेल्या डॉ. पुजा खेडकर यांना ३ जून २०२४ पासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आले होते. मात्र, पूजा खेडकर हिने खासगी ऑडी कारवर शासकीय दिवा आणि महाराष्ट्र सरकारचे चिन्ह लावले होते. त्यांच्या कारनाम्याचे फोटो व्हायरल झाले होते. स्वत:ला गरीब आणि दृष्टीदोष असल्याचं सांगणाऱ्या अधिकारी इतक्या महागड्या ऑडी कारमधून फिरत असल्याने अनेक प्रश्न उपस्थितीत झाले होते. वाद वाढल्यानंतर तिची वाशिमला बदली सुद्धा करण्यात आली होती. अखेरीस आता केंद्र सरकारने पूजा खेडकर कार्यमुक्त केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!