नाशिक ( वास्तव पोस्ट ) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क अधिकार यांची जाणीव करून देत असतानाच त्यांनी एक परिपूर्ण माणूस म्हणून विकसित व्हावं व त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा या उद्देशाने कॉ. नरेंद्र मालुसरे संकुल, खुटवड नगर येथे एस. एफ. आय. विद्यार्थी संघटने मार्फत भारतीय स्वातंत्र्यदिनाचे निमित साधून फिल्म क्लबची सुरुवात करण्यात आली.
चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेले माणुसकी, प्रेम, आपुलकी, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता ही मूल्य आपल्यात विकसित व्हावी हा देखील उद्देश आहे.
या उपक्रमाची सुरुवात विद्यार्थी संघटनेचे आदर्श असलेले थोर समाजवादी क्रांतिकारक कॉम्रेड शहीद भगतसिंह यांच्या जीवनावर आधारित ‘द लिजेंड ऑफ भगतसिंग’ हा चित्रपट विद्यार्थ्यांना दाखऊन करण्यात आली. या उपक्रमाचे नाविन्य म्हणजे चित्रपट बघितल्यानंतर विद्यार्थ्यांनी एक तास चित्रपटावर आधारित गटचर्चा करण्याचे नियोजन आहे. यातून विद्यार्थ्यांच्या विचारशक्ती ला चालना मिळेल.
या उपक्रमात शहरसचिव राहुल गायकवाड, शहरअध्यक्ष कुणाल माळी, खजिनदार धम्मदिप औटे, उपाध्यक्ष श्रुती वैष्णव, दिनेश शार्दुल, सहसचिव ओम यादव, साक्षी काकडे, करिना राऊत, माधुरी सोनटक्के, मीनल पाटील, राहेल पवार, साक्षी पाटील इ. विदयार्थी पदाधिकारी सहभागी होते.
