जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार १३ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे …
मंगळवार दि.१३ रोजी
- दुपारी २:३० वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने सागर पार्क जळगावकडे प्रयाण
- दुपारी ३:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमासाठी सागर पार्क, जळगाव येथे आगमन.
सागर पार्क, जळगाव येथून
- सायंकाळी ५:१५ वाजता मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण,
- सायं ५:३० वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण,
- सायं ६:३० वाजता मुंबई विमानतळ येथे आगमन व मोटारीने वर्षा निवासस्थानकडे प्रयाण,
- सायंकाळी ७:०० वाजता वर्षा निवासस्थान येथे आगमन व राखीव.
