Home » जळगाव » ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड यांच्यावतीने वावडदा शाळेत वृक्षारोपण

‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड यांच्यावतीने वावडदा शाळेत वृक्षारोपण

वृक्ष लागवडीचा जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड यांचा मानस

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : माध्यमिक विद्यालय वावडदा ता. जि. जळगाव, या शाळेत वृक्षारोपण संवर्धन कार्यक्रम गांधी रिसर्च फौंडेशन व माध्यमिक विद्यालय वावडदा याच्या संयुक्त विद्यमानाने उत्साहात हाती घेतला आहे. वन महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत व एक पेड माँ के नाम या धोरणानुसार शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या शाळेच्या परिसरात करंज,आवळा,आंबा, गुलमोहर, सीताफळ, पिंपळ,निबं, साग, सेतू, जास्वंद, चिंच या ११ प्रकारच्या ५० झाडे मान्यवरांच्या हस्ते लावण्यात करण्यात आली. या वृक्षारोपण कार्यक्रमा प्रसंगी सेवानिवृत्त वन अधिकारी तथा सल्लागार वन, वन्यजीव व पर्यावरण विभाग जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे राजेंद्र राणे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एन.आर. दाणे, शिक्षक ए.डी. पाकले, शिक्षिका एम.डी. अहिरे, एम.आर. चौधरी, एस.बी. पाटील, ए.एम.पाटील, कुंदन पाटील व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

प्रत्येक विद्यार्थ्याने एक मुलं एक झाड ही संकल्पना राबविली पाहिजे तसेच प्रत्येक विध्यार्थ्यांने आपल्या घरा जवळ एक झाड लावून त्या झाडाचे जतन करावे, असे आवाहन विध्यार्थ्यांना करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फौंडेशन चे क्षेत्रीय अधिकारी विक्रम अस्वार व रामदेववाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते जीवन राठोड यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!