Home » जळगाव » अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथि मू.जे. महाविद्यालय साजरी

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथि मू.जे. महाविद्यालय साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आज मू.जे. महाविद्यालयात “साहित्य कला व सांस्कृतिक मंडळाच्या” वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी भाषा प्रशालेचे संचालक प्रो.भूपेन्द्र केसूर आणि समाजशास्त्र प्रशालेचे संचालक प्रा.देवेंद्र इंगळे व महाविद्यालयातील प्राध्यापक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. योगेश महाले सर यांनी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाविषयी तसेच लोकमान्य टिळका विषयी बहुमूल्य असे विचार मांडले. ते म्हणाले तळागाळातील लोकांना आपल्या साहित्याच्या माध्यमातून त्यांचे दुःख जगासमोर आणून त्यांना सन्मान देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. तर आपल्या देशासाठी “स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार” आहे, असा उद्घोष देणारे लोकमान्य टिळकांनी आपल्या देशासाठी अतुलनीय योगदान दिलेला आहे असे ही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार साहित्य व कला सांस्कृतिक मंडळाचे सचिव डॉ. अखिलेश शर्मा यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!