Headlines
Home » शैक्षणिक » पी.एम.मुंदडे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

पी.एम.मुंदडे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : येथील उपनगरातील पी.एम. मुंदडे माध्यमिक विद्यालय येथे दि.३१ जुलै रोजी समूह साधन केंद्र क्रमांक ४ आणि ७ साठी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्र प्रमुख कुसुम पाटील अध्यक्ष स्थानी होत्या.

शिक्षण परिषदेच्या सुरवातीस पी.एम.मुंदडे विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर कुमावत यांनी केंद्र प्रमुख कुसुम पाटील यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन केला. सदर परिषदेस समूह साधन केंद्रातील मुख्याध्यापक तसेच सहाय्यक शिक्षक उपस्थित होते.

काल संपन्न झालेल्या या शिक्षण परिषदेत ‘सेतू अभ्यास सद्य स्थिती व पायाभूत चाचणी गुण नोंदणी‘ या विषयावर विश्लेषण व मार्गदर्शन मनोज गायकवाड यांनी केले. ‘वंचितांचे शिक्षण अडचणी व उपाययोजना‘ विषयक चर्चा आणि मार्गदर्शन मनिषा सुर्यवंशी यांनी, तसेच ‘दप्तर मुक्त शाळा‘ याविषयावर मार्गदर्शन मुंदडे विद्यालयाचे जगदीश बियाणी यांनी केले.

सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनीता पाटील यांनी केले. CRG मदतीने पूर्वनियोजन करून शिक्षण परिषद यशस्वीरीत्या आयोजित करण्यासाठी मुंदडे विद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!