Home » महाराष्ट्र » तृतीयपंथीयांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे ; विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

तृतीयपंथीयांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे ; विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

विभागीय दक्षता समितीची आढावा बैठक संपन्न

Dr. Pravin Gedam : विभागीय समितीच्या आढावा बैठकीत डॉ. प्रवीण गेडाम म्हणाले की, तृतीयपंथी यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणण्यासाठी त्यांना आर्थिक सक्षम करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना केंद्र सरकार व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून रोजगाराची, स्वयं रोजगाराची संधी उपलब्ध करून द्याव्यात.

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : तृतीयपंथीयांचे जीवनमान सुलभ होण्यासाठी त्यांना रोजगार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित शासकीय यत्रंणांनी तृतीयपंथीयांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करून विविध माध्यमातुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयातील समिती कक्षात विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आला होते, त्यावेळी श्री गेडाम बोलत होते.

दूरदृश्यप्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सहायक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प. सहभागी झाले होते.

प्रत्यक्ष बैठकीस उपायुक्त (ग्रामीण) चंद्रकांत खांडवी, उपायुक्त मंजिरी मनोलकर , जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, सहायक पोलीस आयुक्त भगीरथ देशमुख, सहायक आयुक्त देविदास नांदगावकर आदी यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!