Home » जळगाव » ट्रेनिंग अँड प्लेसमेंटसाठी आयएमआर आणि डब्ल्यूएनएस यांच्यात करार

ट्रेनिंग अँड प्लेसमेंटसाठी आयएमआर आणि डब्ल्यूएनएस यांच्यात करार

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च आणि पुणे स्थित डब्ल्यूएनएस केअर फाउंडेशनमध्ये आयएमआरच्या विद्यार्थ्यांच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंटसाठी तीन वर्षांकरिता करार करण्यात आला. या करारातंर्गत डब्ल्यूएनएस ही कंपनी आयएमआरच्या विद्यार्थ्यांना तीन प्रकारच्या कोर्सेसची ट्रेनिंग देईल.

पहिले ट्रेनिंग अकाऊंटिंग आणि फायनान्स असेल. यात पेमेंट अँड टॅक्स, कॅश फ्लो मॅनेजमेंट, कॅश ॲप्लिकेशन, बँक रिकनसिलेशन, मास्टर डाटा क्रिएशन, सॉफ्ट स्किल्स, लीडरशिप स्किल्स आणि रिपोर्टींग सिस्टीमचा समावेश राहील.

तसेच दुसरी ट्रेनिंग कस्टमर इंटर ॲक्टिव्ह सर्व्हिसवर असेल. ज्यात बेसिक कम्युनिकेशन, कस्टमर कल्चर, ब्रेनरी, चेंज मॅनेजमेंट, प्रोफेशनल वर्क, डोमेन ट्रेवल, युटिलिटी आणि कन्सल्टींग राहील.

तिसरे ट्रेनिंग प्रोग्राम सॉफ्ट स्किल्स, प्रेझेंटेशन स्किल्स, कम्युनिकेशन एटीकेट, ग्रुप डिस्कशन, मोटीवेशन, सेल्फ-ग्रुमिंग, पब्लिक स्पिकिंग, टीम बिल्डिंग आणि बिजनेस रायटींगवर असेल.

हे सर्व ट्रेनिंग प्रोग्राम आयमएमआरच्या विद्यार्थ्यांसाठी निशुल्क आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला ट्रेनिंगचे प्रमाणपत्र मिळेल. त्यानंतर कंपनी आपल्या मुंबई आणि पुणे स्थित ऑफिससाठी प्लेसमेंट देखील देणार आहे. आयमएमआरच्या वतीने करारावर संचालका प्रो. डॉ. बी.व्ही. पवार यांनी तर डब्ल्यूएनएस केअर फाउंडेशनतर्फे नॅशनल हेड गोपी कृष्णन यांनी स्वाक्षरी केली. या कराराचे संयोजन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट हेड प्रा. पुनीत शर्मा यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!