Headlines
Home » शैक्षणिक » ‘ओजस्विनी’ च्या ए.टी.डी. चा निकाल १०० टक्के

‘ओजस्विनी’ च्या ए.टी.डी. चा निकाल १०० टक्के

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओजस्विनी कला महाविद्यालयाच्या वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून हा निकाल १०० टक्के लागला आहे.

ए.टी.डी. च्या प्रथम वर्षाच्या वार्षिक परीक्षेत दिपल प्रदीप टापरे हिने प्रथम श्रेणी मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. फाउंडेशनच्या वार्षिक परीक्षेत मयूर सोपान पाटील (प्रथम श्रेणी) याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर ए.टी.डी. च्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेत आरती अनिरुद्ध जाधव हिने प्रथम क्रमांक मिळविला.

या गुणवंत विद्यार्थ्यांना प्राचार्य मिलन भामरे, प्रा.पुरुषोत्तम घाटोळ, प्रा.पियुष बडगुजर, प्रा.डिगंबर शिरसाळे यांचे मार्गदर्शन लाभले. गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीच्या भविष्यासाठी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर व प्राचार्य मिलन भामरे यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!