जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित लोकप्रिय शिक्षक आमदार आदरणीय किशोर भाऊ दराडे प्रचंड मताधिक्यांनी पुन्हा एकदा शिक्षक आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांचा समता शिक्षक परिषद व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा आयोजित जाहीर सत्कार करण्याविषयी तसेच जळगाव जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्न संदर्भात जाहीर सत्काराबाबतीत भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासोबत शिक्षकांच्या समस्यां बाबत चर्चा केली.
सदर चर्चेत माध्यमिक शिक्षण विभाग, वरिष्ठ व निवड श्रेणी, सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पेन्शन, शाळांच्या टप्पा अनुदान, वेतन पथक, अपूर्ण कर्मचारी संख्या, शाळा महाविद्यालयातील विशाखा समिती पुनर्रचना बाबत चर्चा झाली. ट्रेझरीतील बिल संदर्भात विषय जिल्हाधिकारी यांनी तात्काळ ट्रेझरी ऑफिसर राजेंद्र खैरनार यांना संपर्क केला व माहिती जाणून घेतली, आणि समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना ट्रेझरी ऑफिसमध्ये वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पाठवले.
ट्रेझरी ऑफिसमध्ये गेल्यावर ट्रेझरी ऑफिसर राजेंद्र खैरनार यांनी तात्काळ वेतन पथक अधीक्षक राजमोहन शर्मा यांचेशी पीएफ बिल व रजा रोखीकरणाच्या बिल विषयी अत्यंत सकारात्मक चर्चा करून वेतन पथकातील कर्मचारी सोनवणे स्वतः कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार आणि वेतन पथक अधीक्षक राजमोहन शर्मा साहेब यांनी त्रुटी पूर्ण करून घेतल्या.
याप्रसंगी समता शिक्षक परिषदेचे प्रदेश अध्यक्ष भरत शिरसाट, माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीचे व शिक्षक भारती जिल्हा अध्यक्ष नारायण वाघ, समन्वय समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. मिलिंद बागुल, समन्वयक तसेच पूर्व माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक तुळशीराम सोनवणे, समन्वय समितीचे कार्याध्यक्ष तसेच शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष गोविंदा पाटील, समता शिक्षक परिषद जिल्हा सरचिटणीस एस.आर. महाजन, अनिल चव्हाण कानळदा हे उपस्थित होते.
