Home » महाराष्ट्र » पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांच्या घटस्फोटासंदर्भातला अहवाल केंद्राकडे सादर

पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांच्या घटस्फोटासंदर्भातला अहवाल केंद्राकडे सादर

पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांच्या घटस्फोटासंदर्भात दहा पानांचा अहवाल तयार करुन पुणे पोलिसांनी राज्य सरकारकडे गुरुवारी पाठवला आहे. केंद्र सरकारने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. कुठल्याही अटी शर्थी शिवाय २०१० मध्ये घटस्फोट झाल्याचे अहवालात म्हटले आहे. पूजा खेडकर यांना ओबीसी कोट्यातून अर्ज करता यावे, त्यांना नॉन क्रिमिलेअरचा लाभ मिळावा, यामुळे हा घटस्फोट दाखवल्याचा आरोप होता. १० पानांच्या या अहवालात घटस्फोटाबाबतच्या कायदेशीर बाबीच्या नोंदी आहेत. त्यामुळे या अहवालानंतर घटस्फोटामागील गूढ उलघडणार आहे.

काय आहे प्रकरण ?
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी नुकतीच अहमदनगर मतदार संघातून निवडणूक लढवली होती. पूजा च्या आई-वडीलांचे उत्पन्न कोट्यवधींमध्ये आहे. निवडणूक फॉर्म मध्ये त्यांनी त्यांचे आणि कुटुंबाचे उत्पन्न ४०.५ कोटी दाखवले होते. ते स्वत: शासकीय सेवेत वर्ग एक अधिकारी होते. त्यानंतर त्यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले? पूजा खेडकर यांची आई मनोरम खेडकर या कोट्यवधी रुपये किंमतीच्या घरात राहतात. त्यांच्याकडे जमीन आहे. मग त्याकाळी क्रिमिलेअरसाठी साडेचार लाखांची मर्यादा होती. तर ते प्रमाणपत्र कसे मिळले? दिलीप खेडकर आणि पूजा खेडकर खरंच वेगवेगळे राहतात का? त्यांचा घटस्फोट झाला आहे का? या संदर्भात चौकशी करुन अहवाल देण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले होते.

दरम्यान राज्य सरकारने हे प्रकरण सीआयडीकडे दिले होते. परंतु या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करत असल्यामुळे त्यांच्याकडे मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच्या घटस्फोटाचा अहवाल देण्याचे काम दिले. पूजा खेडकर ह्या सर्व बाजुनी अडचणीत आल्या असुन त्यांची आई एका गुन्ह्यात येरवडा कारागृहात आहे. तर वडिलांची एसीबी चौकशी सुरु आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!