Home » जळगाव » ओरियन सीबीएसई शाळेत विद्यार्थ्यांनी अनुभवला गुरु शिष्य परंपरेचा महिमा

ओरियन सीबीएसई शाळेत विद्यार्थ्यांनी अनुभवला गुरु शिष्य परंपरेचा महिमा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन आणि गुरू पूजन करून गुरूंचा आशीर्वाद घेतला. विद्यार्थ्यांनी गुरु शिष्य परंपरेतील उल्लेखनीय व्यक्तींची भूमिका प्रत्यक्ष साकारत ओळख करून दिली.

याप्रसंगी काही चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गुरु महात्म्य सांगितले. तर काही विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्य कलेतून गुरु शिष्य परंपरेतील ठळक वैशिष्ट्ये सादर केली. प्राचार्या सुषमा कंची यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले.

विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील जीवनामध्ये अपेक्षित यश संपादन करण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्नशील रहावे, याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर आपल्या जीवनातील प्रथम गुरु आई, वडील यांच्या विषयी आपण किती नतमस्तक रहावे, याविषयी विशेष मार्गदर्शन प्राचार्या सुषमा कंची यांनी विद्यार्थ्यांना केले. संगीत विभागातर्फे संगीत शिक्षकांनी गुरूंना समर्पित काही निवडक गुरू भक्ती गीत सादर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!