Headlines
Home » जळगाव » ए. टी. झांबरे विद्यायात ‘वयात येताना’ उपक्रम

ए. टी. झांबरे विद्यायात ‘वयात येताना’ उपक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात लैंगिक प्रबोधन सप्ताहानिमित्त पौगंडावस्थेतील मुलांच्या समस्यांचे निराकरण अंतर्गत विद्यार्थ्यांना ‘वयात येताना’ ही फिल्म दाखवण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी आपल्या शरीरातील लैंगिक व मानसिक बदल, पौगंडावस्थेतील येणाऱ्या समस्या समजून घेतल्या.

याबाबतचे समुपदेशन अंनिसच्या वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्पाचे राज्य कार्यवाह दिगंबर कट्यारे यांनी केले. मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी दिगंबर कट्यारे यांचे स्वागत केले. प्रास्ताविक नेमाडे यांनी केले. या वेळी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!