Headlines
Home » जळगाव » सोहम योगतर्फे गुरु पौर्णिमेनिमित्त रविवारी ध्यान साधना कार्यशाळा

सोहम योगतर्फे गुरु पौर्णिमेनिमित्त रविवारी ध्यान साधना कार्यशाळा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारा गुरू पौर्णिमेनिमित्त सामूहिक ध्यान साधना कार्यशाळेचे आयोजन रविवा, दि.२१ जुलै रोजी करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सकाळी ८ ते ९ या वेळेत, आनंदयात्री योग हॉल, सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, एकलव्य परिसर, मू.जे. महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

कार्यशाळा ही सर्वांसाठी नि:शुल्क असून १२वर्षांवरील कोणत्याही वयोगटातील महिला, पुरुष विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या ध्यान कार्यशाळेला सोहम डिपार्टमेंटचे संचालक डॉ. देवानंद सोनार हे मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी सर्वांकडून सामूहिक ध्यान साधना करुन घेतली जाईल.

ताण तणाव, नैराश्य, चिंता यासारख्या मानसिक विकारांसोबतच उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या विकारांसाठी ही ध्यान साधना उपयुक्त आहे. शारीरिक, मानसिक आरोग्यासोबतच आध्यात्मिक लाभ प्राप्त करुन घेण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या ध्यान साधना कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!