Headlines
Home » आंतरराष्ट्रीय » वजिरएक्स एक्सचेंजवर हॅकरने मारला डल्ला ; तब्बल २,००० करोड केले लंपास

वजिरएक्स एक्सचेंजवर हॅकरने मारला डल्ला ; तब्बल २,००० करोड केले लंपास

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आभासी चलन म्हणजेच क्रिप्टो करंसीच्या दुनियेतुन एक खात्रीलायक खळबळजनक बातमी समोर आली आहे. भारतीय मालकीचे सर्वात जास्त वापरकर्ते असलेले नावाजलेले क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग एक्सचेंज “वजिरएक्स” हे हॅक झाले असून या एक्सचेंजच्या अकॉउंटमधून २३४ मिलियन डॉलर्स हॅक झाल्याची बातमी समोर आली आहे. वजीरएक्स ने आपल्या X या सोशल मिडिया अकॉउंटवरून ही अपडेट आपल्या वापरकर्त्यांना दिली आहे.

भारतीय चलनानुसार ही रक्कम जवळजवळ २,००० करोड़ पेक्षाही जास्त आहे. ही रक्कम अकॉउंट मधून हॅकरने आपल्या वॉलेट मध्ये ट्रांसफर केली आहे. या व्यवहाराकरीता टोर्नेडो कॅश सॉफ्टवेयरचा वापर करण्यात आला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एवढी मोठी रक्कम ट्रांसफर केल्यानंतर हॅकरने अल्ट क्रिप्टो करन्सीला आता एथेरियम करन्सी मध्ये स्वॅप करायला सुरवात केली आहे.

दरम्यान या प्रकारामुळे क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक आणि ट्रेडिंग करणाऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. कारण वजिरएक्स एक्सचेंजने आपल्या ग्राहकांना सध्या कोणत्याही प्रकारचे ट्रांझेक्शन करण्यास मनाई केली आहे. क्रिप्टो करंसी आणि डॉलर्स सोबतच आता भारतीय चलन मध्ये देखील विड्रॉल देणे बंद केले आहे.

हॅक झालेली रक्कम ही क्रिप्टो करंसीत गुंतवणूक कारणाऱ्यांची असल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. आता हॅकरकडून ही रक्कम परत मिळविणे कठीण बाब असुन वजिरएक्स ने मात्र आपल्या वापरकर्त्यांना न घाबरण्याचे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!