Home » जळगाव » ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूलमध्ये रंगला आषाढी एकादशी सोहळा

ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूलमध्ये रंगला आषाढी एकादशी सोहळा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूलमध्ये आषाढी एकादशी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी कीर्तन, भजन, पावली, भारुडे, फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला.

या वेळी प्राचार्य श्रीधर सुनकरी, उपप्राचार्या रजनी गोजोरेकर व शिक्षक बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन मृणाल ठाकूर आणि सेजल पाटील यांनी केले. रोहन पाटील यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!