Home » जळगाव » किलबिल बालक मंदिरात विद्यार्थी झाले वारकरी

किलबिल बालक मंदिरात विद्यार्थी झाले वारकरी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश एज्युकेशन सोसायटी संचालित किलबिल बालक मंदिर शाळेत आषाढी एकादशीनिमित्त सिनियर बालवाडीच्या विद्यार्थ्यांची दिंडी शाळेपासून ते हरी मंदिरापर्यंत काढण्यात आली. प्रमुख पाहुण्या संगीता बोरोले यांनी पालखीचे पूजन केले आणि दिंडीमध्ये सहभागी झाल्या. मुख्याध्यापिका अर्चना नेमाडे यांनी मार्गदर्शन केले.

सिनियर बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी विविध भूमिका साकारल्या. विठ्ठलाच्या भूमिकेत ध्रुव शेळके, रुक्मिणीच्या भूमिकेत नम्रता, मुक्ताईच्या भूमिकेत कनिष्का, सोपानदेवच्या भूमिकेत स्वराज देशमुख, नामदेव महाराजांच्या भूमिकेत हिमांशू जाधव, तुकाराम महाराजांच्या भूमिकेत कार्तिकेय, चांगदेव महाराजांच्या भूमिकेत श्लोक, ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमिकेत जियांश, निवृत्ती महाराजांच्या भूमिकेत युग महाजन, वाघाच्या भूमिकेत लकी सोनवणे.

अशाप्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारून दिंडीची शोभा वाढवली. या कार्यक्रमात सीनियर बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे बांधव भिंतीवर बसून योगीराज चांगदेव महाराज भेट ही सजीव आरास साकारली. याचप्रमाणे नवगाळे काकांनी वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या विद्यार्थ्यांचे पूजन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!