Headlines
Home » जळगाव » पाचोरा येथे वृंदावन कॉलनी परिसरात मतदार नोंदणी अभियानास सुरुवात

पाचोरा येथे वृंदावन कॉलनी परिसरात मतदार नोंदणी अभियानास सुरुवात

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : शहरातील वृंदावन कॉलनी परिसरात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सौजन्याने मोफत मतदार नाव नोंदणी व दुरुस्ती अभियानास आज पासून सुरुवात करण्यात आली. यावेळी वैशालीताईंच्या उपस्थितीत मतदार नोंदणी अभियानास सुरवात करून नागरिकांच्या समस्या सोडविण्यात आल्या.

या दरम्यान १८ वर्ष पूर्ण झालेले नवीन मतदार व मतदार यादीतून ज्यांचे नाव गहाळ झालेले तसेच नाव-पत्ता दुरुस्ती, फोटो बदलणे, मयत व्यक्तीचे नाव कमी करणे, मोबाईल नंबर अपडेट करणे अशा विविध सुविधा नोंदणी अभियानात दिल्या गेल्यामुळे नागरिकांना सोयीस्कर झाले.

या नोंदणी अभियानाच्या यशस्वीतेसाठी पप्पु जाधव, संदीप जैन, अभिषेक खंडेलवाल, हरिष देवरे, मनोज चौधरी, अनिल सावंत, विनोद कुमावत, दशपुते सर, मोहन पापडीकर, राजेंद्र चव्हाण, जयश्री येवले, वंदना शिरसाठ इ. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!