कजगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भडगाव तालुक्यातील कजगाव येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अक्षय मालचे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कजगाव चे उपसरपंच संभाजी पवार यांनी ठरल्या प्रमाणे कजगाव ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने नव्याने होऊ घातलेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी अक्षय मालचे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची कजगाव ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
सदर निवडीचे सर्वच स्तरातुन अभिनंदन केले जात आहे नवनियुक्त उपसरपंच पदासाठी अक्षय मालचे यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने सरपंच रघुनाथ महाजन ग्रामविकास अधिकारी नारायण महाजन यांनी मालचे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या प्रसंगी उपस्थित सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी शाल श्रीफळ गुलाबपुष्प देत नवनिर्वाचित उपसरपंच अक्षय मालचे यांचा सत्कार केला.
यावेळी सरपंच रघुनाथ महाजन, ग्रामविकास अधिकारी नारायण महाजन, मावळते उपसरपंच समाधान पवार, माजी सरपंच मनोज धाडीवाल माजी उपसरपंच हाजी शे.शफी मण्यार ग्रामपंचायत सदस्य मांगीलाल मोरे, सादिक मण्यार, पुंडलिक सोनवणे, भिकु पाटील, शोभा बोरसे, कविता महाजन, माजी उपसरपंच स्वीटी धाडीवाल, पल्लवी पाटील, अंजनाबाई सोनवणे, गरबड बोरसे, विजय गायकवाड, बालू सोनवणे, चंद्रकांत महाजन, रामदास महाजन, वाल्मिक मोरे, पप्पु बोरसे, धर्मराज मिस्तरी, दिनेश पाटील, रहिमान शा फकीर यांसह ग्रामपंचायत कर्मचारी संजय पाटील, सुनिल पाटील, रविंद्र मालचे, ऋषिकेश सोनवणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसंगी नवनिर्वाचित उपसरपंच मालचे यांचा विविध मान्यवरांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
