जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे १८ महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या १० दिवसीय वार्षिक प्रशिक्षण शिबिराच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर कुलगुरु डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, कमांडिंग ऑफिसर कर्नल अभिजित महाजन, प्राचार्य डॉ. गौरी राणे, प्राचार्य डॉ.राजेंद्र खड़ायते, उपप्राचार्य डॉ.बी.एन. केसूर, प्र प्राचार्य मेजर ए.डी. वळवी, लेप्टनंट गौतम भालेराव उपस्थिती होते.
लेप्टनंट गौतम भालेराव यांनी प्रास्ताविक केले. वार्षिक प्रशिक्षण शिबिरात जळगाव जिल्हातील सीनियर आणि ज्युनियर डिव्हीजनमधील एकूण ५०० छात्र सहभागी होते. कमांडिंग ऑफिसर कर्नल अभिजित महाजन यांच्या नेतृत्वाखाली वार्षिक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा उद्देश कॅडेट्सला लष्करी व शारीरिक प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांना समाजासाठी चांगले आणि शिस्तबद्ध नागरिक तयार करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता, नेतृत्व, व्यक्तिमत्व विकास, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण, सायबर सुरक्षा, मोटार वाहन नियमांचे प्रशिक्षण देण्यात आले.
CATC-108 वार्षिक प्रशिक्षण शिबिरात कॅडेट्समध्ये नेतृत्व, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक कौशल्ये वाढवण्यासाठी ४ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ९ महाविद्यालयातील कॅडेट्सनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यात ड्रिल, मैप रीडिंग, जे. डी अँड एफ. एस., मिलट्री अकॅडमिक कॉम्पिटेशन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत लेप्टनंट गौतम भालेराव यांनी माहिती दिली.
◆ पदवी सोबत कौशल्य विकसित करा
कुलगुरु डॉ.व्ही.एल. माहेश्वरी यांनी आपल्या मार्गदर्शनात एनसीसीतील शिस्त आणि अनुशासन याची आजच्या काळात नितांत आवश्यकता व्यक्त केली. केवळ कोणत्याही विषयाचे ज्ञान असून चालत नाही, तर विद्यार्थ्यांना ज्ञान आणि भान यांची सांगड घालता आली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा आणि संवेदना अशा कॅम्पच्या माध्यमातून जागृत होत असतात. आज धावपळीच्या युगात शिक्षणासह अतिरिक्त कौशल्य आणि ज्ञान संपादन करणाऱ्यांना नोकरीच्या संधी मिळतात. तसेच कोणत्याही व्यक्तीला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी स्वयं शिस्त आणि वेळेच्या महत्वाची जाणीव असली पाहिजे, सदैव चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि स्पर्धामक युगात पदवीसोबत इतर कौशल्य विकसित करावे, असे मार्गदर्शन कुलगुरुंनी केले. भावी शैक्षणिक आणि एनसीसीतील कार्यक्रमांमध्ये स्वतःचे आणि महाविद्यलयाचे नाव मोठे करण्याच्या कॅडेट्सला शुभेच्छा दिल्यात.
◆ स्पर्धेतील विजेते
कुलगुरु डॉ. व्ही एल माहेश्वरी यांच्या हस्ते ड्रिल, मॅप रिडींग, जगिंग डिस्टन्स आणि मिलट्री अकॅडमिक कॉम्पिटेशन या स्पर्धांमध्ये प्रथम स्थान प्राप्त करणाऱ्या मू. जे. महाविद्यालयाचे कॅडेट आणि उपप्राचार्य डॉ. बी. एन.केसूर यांना फिरते चषक ( ट्रॉफी ) देऊन सन्मानित करण्यात आले. तर या स्पर्धांमध्ये द्वितीय स्थान प्राप्त करणाऱ्या नूतन मराठा महाविद्यालय आणि अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महाविद्यालयाच्या कॅडेट्सला मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
वार्षिक प्रशिक्षण शिबिर १०८ मध्ये जळगाव जिल्ह्यातील विविध २६ विद्यालय आणि ९ महाविद्यालयातील कॅडेट प्रशिक्षण घेत असून शिबिराच्या यशस्वितेसाठी कर्नल अभिजित महाजन, लेप्टनंट गौतम भालेराव, लेप्टनंट अमर पवार, सेकंड ऑफिसर मनोज चौधरी, सिटीओ गोविंद पवार, सिटीओ सायली पाटील, सुभेदार मेजर प्रेमसिंग, सुभेदार अनिलकुमार, सुभेदार झहीर अहमद, सुभेदार रामकिसन, नायब सुभेदार सतीशकुमार, जीसीआय अलका राय, बीएचएम अमोल साळुंखे, सीएचएम बलवीरसिंग, पद्माकर भारस्कर, भागवत ढाके, गौरव निमजे, विनोद हडप, सुनील सोनार, ओंकार कापुरे, पीआय स्टाप कॅडेटला प्रशिक्षण देण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
