Headlines
Home » जळगाव » भडगावातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

भडगावातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

भडगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : शहरातील जलाली मोहल्ला भागातील पदाधिकाऱ्यांनी आज वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग होत असल्याचे दिसून येत आहेत. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसेच अन्य पदाधिकारी पक्षात दाखल होत आहेत. या अनुषंगाने आज भडगाव शहरातील जलाली मोहल्ला या भागातील पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश घेतला. या सर्वांचे वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी स्वागत केले.

प्रवेश घेणाऱ्यांमध्ये मोसिन शेख मुन्ना, समीर शेख गयास, तनवीर खान फारूक, सज्जाद बेग सादिक बेग, आतिफ खान सुलतान खान, अरबाज शहा रोशन शहा, शेख माजिद शेख उस्मान, शैबाज खान इकबाल खान, शैबाज खान युसुफ खान, अरबाज बेग मुक्तार बेग, हुसेफ न्याजोद्दीन मुल्ला, मुजीब अली शाबीर अली, अल्ताफ खान अकबर खान, आबिज शेख अशरफ, मुजम्मील मलिक इसहाक मलिक, साबीर मलिक इसहाक मलिक, हाशिम शेख गयास, साजिद बेग सादिक बेग, जुबेर खान नासिर खान, असद शहा शौकत शहा, शैबाज बेग लाला बेग, समीर बेग शरिफ बेग, तनवीर खान अजमल खान, निसार शहा गफ्फार शहा, निसार शहा रोशन शहा, सलमान शेख अनवर, समीर शेख राईस, अमिन शहा सादिक शहा, फैजान मुस्तकीम खान, हुसेन खान सरदार खान यांचा समावेश होता.

दरम्यान या कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख दीपक पाटील, मनोहर चौधरी, योजनाताई पाटील, इसाक मलिक, इकबाल दादा, अख्तर मुल्लाजी, शब्बीर पठाण, शफिक मास्टर, आयास दादा, युवासेना उपजिल्हाप्रमुख माधव जगताप, तालुकाप्रमुख चेतन पाटील, शहरप्रमुख चेतन रंगनाथ पाटील, देवेन धोबी, संदीप ठाकरे, भैय्या सूर्यवंशी, नवल राजपूत, सनी पटेल यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!