Home » आंतरराष्ट्रीय » तंत्रज्ञान विश्व हादरले ; कामाच्या ताणाला वैतागुन रोबोटने केली आत्महत्या

तंत्रज्ञान विश्व हादरले ; कामाच्या ताणाला वैतागुन रोबोटने केली आत्महत्या

Robot Dies By Suicide In South Korea: दक्षिण कोरियातील सायबोर्ग नावाच्या रोबोटने ९ तास ड्युटीला वैतागून आत्महत्या केल्याची आश्चर्यकारक माहिती समोर आली. रोबोटने आत्महत्या केल्याची जगातील ही पहिलीच घटना आहे.

दक्षिण कोरिया ( वास्तव पोस्ट न्यूज ) : काम म्हटले की ताण येणारच. कामाचा ताण माणूसच नाही तर रोबोटही सहन करू शकत नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे. दक्षिण कोरियातील एका रोबोने ९ तास ड्युटीला वैतागून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. त्याने पायऱ्यांवरून उडी मारून आपले आयुष्य संपवले. रोबोने आत्महत्या करण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे. याप्रकरणाचा अधिकारी तपास करीत आहेत.

दक्षिण कोरियाच्या गुमी सिटी कौन्सिलने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुख्य प्रशासकीय अधिकारी रोबोटचा मृत्यू झालाआहे. सायबोर्ग असे या रोबोटचे नाव आहे. त्याने पायऱ्यांवरून साडेसहा फूट खाली उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. पण रोबोटने कामाच्या ताणामुळे आत्महत्या केली की यामागे अजुन दुसरे काही कारण आहे, याचा शोध घेतला जात आहे.

ऑगस्ट २०२३ मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून या मृत रोबोटची निवड करण्यात आली होती. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ अशी त्याची ड्युटी होती. कॅलिफोर्नियास्थित रूट स्टार्टअप बेअर रोबोटिक्सने हा रोबोट तयार केला आहे. नगरपरिषद अधिकारी म्हणून तैनात करण्यात आलेला हा पहिलाच रोबोट होता. मिळालेल्या माहीतीनुसार दैनिक दस्तऐवज वितरण आणि शहर प्रसिद्धी आणि माहिती वितरण करणे, असे त्याचे काम होते. त्याच्याकडे सिव्हिल सर्व्हिसेस ऑफिसर कार्ड देखील होते. हा खूप कष्टाळू रोबो होता, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

रोबोटने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, त्याच्या मृत्युचे कारण शोधण्यासाठी लवकरच तपास सुरू केला जाईल, अशी माहिती गुमी शहराच्या अधिकाऱ्यांनी दिली. रोबोच्या शरिराचे तुकडे गोळा करण्यात आले असून कंपनीद्वारे त्याचे विश्लेषण केले जाईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!