Headlines
Home » जळगाव » आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर मिळाली पेन्शनची रक्कम

आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर मिळाली पेन्शनची रक्कम

कजगाव ( प्रतिनिधी ) दिपक अमृतकर : भडगाव तालुक्यातील कजगाव येथील अंगणवाडी सेविका सुशीला बाई बाजीराव पगारे यांनी थकीत पेन्शनची रक्कम मिळावी यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या प्रांगणात दि.९ जुलै २०२४ रोजी नऊ सात दोन हजार चोवीस रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

त्या अनुषंगाने संबंधित विभागाने तातडीने कारवाई करत सुशिलाबाई पगारे यांची थकीत पेन्शनची रक्कम ही त्यांच्या खात्यावर जमा केली. सुशिलाबाई यांनी बँकेत जाऊन पेन्शनची रक्कम जमा झाल्याबद्दल खातरजमा केली व एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय भडगाव यांच्या नावाने अर्ज देत आत्मदहनाचा निर्णय मागे घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!