Headlines
Home » महाराष्ट्र » ‘आरोग्याची वारी, आली तुमच्या दारी’ या उपक्रमाचे उद्घाटन

‘आरोग्याची वारी, आली तुमच्या दारी’ या उपक्रमाचे उद्घाटन

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आषाढी वारीच्या निमित्ताने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘आरोग्यवारी – आली आपल्या दारी’ या उपक्रमाचे उदघाटन आज या वारीला भगवा झेंडा दाखवून करण्यात आले.

या आरोग्यवारी मध्ये आळंदी ते पंढरपूर या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर आणि देहू ते पंढरपूर या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाने पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार असून सर्वांना मोफत औषधे दिली जाणार आहेत.

तसेच या उपक्रमाद्वारे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून दुर्धर आजारांना अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांची यादी आणि योजनेचा लाभ कसा मिळवावा याची विस्तृत माहिती देणारे माहीतीपत्रक देखील वाटण्यात येणार आहे.

यावेळी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी समिती चे सह-अध्यक्ष ह भ प श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले आणि वैद्यकीय सहाय्यक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!