Lok Sabha Speaker Election : लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाली आहे. आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले.
नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांच्या कामकाजात निवडून आलेल्या खासदारांनी सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. तसेच लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
ओम बिर्ला यांना एनडीएकडून तर काँग्रेसचे खासदार के सुरेश यांना इंडिया अलायन्सकडून उमेदवारी देण्यात आली होती. आज ओम बिर्ला यांची स्पीकर म्हणून निवड झाली. भाजपमधील एकाच व्यक्तीची सलग दुसऱ्यांदा सभापतीपदी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ओम बिर्ला लोकसभेचे नवे अध्यक्ष सभागृहातील संख्यात्मक ताकदीवरून ओम बिर्ला हे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक सहज जिंकणे निश्चित मानले जात होते.
आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले आहे. येत्या पाच वर्षात तुम्ही आम्हा सर्वांना मार्गदर्शन कराल असा आम्हा सर्वांना विश्वास आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
१८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजप खासदार ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ओम बिरला यांना त्यांच्या आसनापर्यंत पोहोचवलं. त्यांच्यासोबत हा पदभार घेतांना सर्व उपस्थित होते.
