Home » जळगाव » केसीईचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात योग दिन साजरा

केसीईचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात योग दिन साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तमरित्या राखण्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. योगासने हा केवळ एक व्यायाम नाही, तर स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकरूपतेची भावना शोधण्याचा मार्ग आहे, असे प्रतिपादन कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ.संजय सुगंधी यांनी केले.

सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागाचे प्रा.गौरव जोशी यांनी प्राणायाम, सूर्य नमस्कार, विविध योगासने या बद्दल प्रात्यक्षिक सर्वांकडून करून घेतले.

कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्यं डॉ. संजय सुगंधी, अकॅडमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन डॉ.श्रीकांत तारे, पॉलीटेकनिक चे समन्वयक डॉ. सी.एस पाटील, क्रीडा विभागाचे प्रमुख नितीन चौधरी, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा.विजय चौधरी व प्रा.राहुल पाटील यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!