जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमधील परिसर मुलाखतीत एमबीए द्वितीय वर्षाच्या शुभम दोरकर या विद्यार्थ्याची निवड ही पुणे स्थित सुहाना मसालेच्या हेडक्वार्टरला असोसिएट ऑपरेशन ऑफिसरच्या पदावर झाली.
शुभम यास वार्षिक चार लाख पन्नास हजारांचे पॅकेज मिळाले आहे. याबाबत खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि आयएमआरचे संचालक डॉ. बी.व्ही. पवार यांनी शुभमचे अभिनंदन केले. आयएमआर तर्फे प्रा.पुनीत शर्मा यांनी संयोजन केले.
