Home » राष्ट्रीय » एकनाथ खडसे यांनी घेतली अमित शाह यांची भेट ; केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचीही उपस्थिती!

एकनाथ खडसे यांनी घेतली अमित शाह यांची भेट ; केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचीही उपस्थिती!

Eknath Khadse in BJP ! : एकनाथ खडसे यांनी रात्री रक्षा खडसे यांच्यासह अमित शाह यांची भेट घेतल्याने त्यांचा भाजप प्रवेशाचा अडथळा दूर झाला असुन, लवकरच एकनाथ खडसे यांचे भाजपमध्ये कमबॅक होणार असल्याचे समजते.

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : एखनाथ खडसे यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यांनी यापूर्वीच भाजपमध्ये जाणार असल्याचे उघड केले होते. नाथाभाऊ हे भाजपचे जुने नेते. मध्यंतरी पक्षातील कुरबुरी वाढल्यानंतर त्यांनी वेगळा निर्णय घेतला.

एकनाथ खडसे यांनी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. यावेळी भाजपच्या नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे ह्या देखील भेटी दरम्यान उपस्थित होत्या. ही सदिच्छा भेट असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘खडसे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश’ यावर चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर खडसे आणि शहा यांची भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी नुकतेच माध्यमांशी बोलताना नाथाभाऊ हे मोठे नेते आहेत, त्यांच्या प्रवेशासंदर्भात आमचे केंद्राचे आणि राज्याचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेऊन योग्य वेळी नाथाभाऊंचा प्रवेश होईलच असा विश्वास व्यक्त केला होता.

दरम्यान भाजप हे माझे घर आहे. भाजपच्या पायाभरणीपासून घर होईपर्यंत मी काही ना काही योगदान दिलेले आहे. काही नाराजीमुळे मी बाहेर पडलो होतो. आता ती नाराजी दूर झालेली आहे, असा खुलासा एकनाथ खडसे यांनी यापूर्वी केला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!