Home » जळगाव » न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणे भोवले ; लाचखोर पीएसआय ला रंगेहाथ पकडले

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणे भोवले ; लाचखोर पीएसआय ला रंगेहाथ पकडले

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव येथिल रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचे निंभोरा पोलीस स्टेशनला जप्त केलेले वाहन मुळ मालकास परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र संबंधीत पोलीस स्टेशनच्या पीएसआय ने गाडी मालकास दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही दहा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या पीएसआय ला जळगाव एसीबी पथकाने रंगेहात पकडले आहे.

कैलास विश्वनाथ ठाकूर असे या लाचखोर पीएसआय चे नाव असून त्याचे विरुद्ध निंभोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या पोलीस स्टेशनला कार्यरत त्याच स्टेशनला लाचखोरीचा गुन्हा दाखल होण्याची वेळ पीएसआय कैलास ठाकूर यांच्यावर आली.

दरम्यान, जप्त केलेले वाहन सोडवण्यासाठी निंभोरा पोलीस स्टेशनचे कार्यरत पीएसआय कैलास ठाकूर यांनी गाडी मालकाकडे पंधरा हजार रुपयांची लाचेची मागणी केली. मात्र गाडी मालकास ती रक्कम देण्याची इच्छा नव्हती. म्हणून त्याने जळगाव एसीबी कडे धाव घेत तक्रार दाखल केली होती. एसीबी पथकाने केलेल्या पडताळणीत पीएसआय कैलास ठाकूर यांनी तडजोडीअंती दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी वाहन मालकास केली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. या सापळ्यात पीएसआय कैलास ठाकूर रंगेहाथ सापडले.

पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी नेत्रा जाधव यांच्यासह पोलीस निरीक्षक अमोल वालझडे, पीएसआय दिनेशसिंग पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी, सचिन साठे, हेड कॉन्स्टेबल सुरेश पाटील, रवींद्र घुगे, महिला हेड कॉन्स्टेबल शैला धनगर, पोलीस नाईक किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पवार, रमेश ठाकूर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!