Home » जळगाव » दिपनगर विज निर्मिती केंद्रातील इंडियन कॅफे हाऊस कॅन्टींग मधील समोशात आढळले झुरळ !

दिपनगर विज निर्मिती केंद्रातील इंडियन कॅफे हाऊस कॅन्टींग मधील समोशात आढळले झुरळ !

भुसावळ ( प्रतिनिधी ) सुमित निकम : भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथे गेल्या अनेक दिवसांपासून दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील ५०० मेगावॅट प्रकल्पातील “इंडियन कॅफे हाऊस कॅन्टीन” मध्ये समोसा मध्ये झुरळ आढळून आले. मात्र याबाबत अद्यापही कॅन्टीन चालकावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.

ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कॅन्टीनबाबत दिपनगर प्रकल्पातील कामगार व कर्मचाऱ्यांकडून नेहमीच तक्रारी येत असतात. तरी देखील कॅन्टीन चालकास अन्न प्रशासन विभाग पाठीशी का घालते ? असा प्रश्न कॅन्टीनमध्ये येणाऱ्या ग्राहक व कर्मचाऱ्यांमध्ये उपस्थित होत आहे. समोसा मध्ये किटकुल झुरळ निघून देखील इंडियन कॅफे हाऊस कॅन्टीनच्या चालकाला पाठीशी घालून दीपनगर प्रशासनाचे अधिकारी का त्याची पाठराखण करत आहे, याबाबत अन्न औषधी प्रशासनाने दीपनगर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी करावी व योग्य ती कारवाई करून या इंडियन कॅफे हाऊसचा कॅन्टीन परवाना रद्द करावा, अशी मागणी ग्राहक व नोकरदार कर्मचाऱ्यांकडून जोर धरु लागली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!