SALMAN KHAN FIRING CASE : सलमान खानच्या घरावर गोळीबार घटने अगोदर त्याच्या फॉर्म हाऊसची रेकीही करण्यात आली होती. याच्या मागे मास्टरमाइंड म्हणून बिश्नोई गँग कार्यरत होती असं पोलीस तपासात उघड झालं आहे. या प्रकरणी वसीम चिकना याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
छत्रपती संभाजीनगर ( वास्तव पोस्ट न्यूज ) : बॉलीवुड अभिनेता सलमान खानच्या घरावर हल्ला प्रकरणात छत्रपती संभाजी नगर शहरातील जालानगरचा रहिवासी असलेला वस्पी मोहम्मद उर्फ वसीम चिकना याचा या हल्ल्याच्या घटनेत सहभाग होता. हल्ल्यासाठी लागणाऱ्या शस्त्रांची जबाबदारी त्याच्याकडे देण्यात आली होती, अशी माहिती मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आली आहे. तसेच तो बिष्णोई गॅंगमध्ये असलेल्या लोकांबरोबर सातत्याने संपर्कात होता ,हे देखील उघड झालं आहे.
दरम्यान बिष्णोईच्या सदस्यांशी संपर्कात असलेला वसीम चिकना हा मूळ शहरातील जालान नगर येथील रहिवासी आहे. यामुळे सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचे धागेदोरे येथे सापडले आहेत. वसीम चिकना हा सातत्याने आपले वास्तव्य वेगवेगळ्या राज्यांमध्ये हलवत होता. सलमान खानच्या घरावर हल्ला करण्याच्या कटात त्याला, फार्म हाउसची रेकी करणे, काडतूस आणि शस्त्राची तस्करी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या साठी तो फार्म हाऊसच्या परिसरात भाड्याने खोलीच्या शोधात होता. वसीमचा एक भाऊ मुंबईत एका हॉटेलमध्ये कामाला असून तो अनेक वर्षांपासून तो मुंबईलाच राहतो. त्यालाही शस्त्र बाळगल्या प्रकरणात पोलिसांनी याआधी अटक केली होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान दि.१४ एप्रिल रोजी सकाळी अभिनेता सलमान खान यांच्या घरावर अज्ञात लोकांनी गोळीबार केला होता. या घटनेत मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या भागातून सहा संशयितांना अटक केली आहे. दरम्यानच्या तपासात सोनू सुभाष चंदर आणि अनुज थापण यांनी हल्लेखोरांना जवळपास ४० काडतुसह दिली होती. तर सागर पाल याला चार मॅगझिन आणि ४० काडतूसे दिली. त्यातल्याच पाच गोळ्या सलमान खान त्याच्या घरावर झाडण्यात आल्या होत्या.
हल्लेखोरांकडून सलमान खानच्याच फार्म हाऊसवर देखील हल्ला करण्याचे नियोजित केले होते. या हल्ल्याच्या घटनेमध्ये पनवेल पोलिसांनी वसीम चिकनासह, धनंजय सिंग, तापेसिंग, अजय कश्यप, गौरव भाटिया, इलियास नखवी, झिशान खान जावेद खान यांना अटक केली आहे.
