Narendra Modi oath: नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.पंतप्रधान मोदी यांच्यासोबत जवळपास ४१ खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये नितीन गडकरी, पियुष गोयल, राजनाथ सिंह, ज्योतिरादित्य शिंदे आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी आदि नेत्यांचा समावेश आहे.
नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नरेंद्र मोदी आज सायंकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी कॅबिनेटमध्ये सामील होणाऱ्या संभाव्य मंत्र्यांना राजधानी दिल्ली येथे आपल्या निवासस्थानी चहापानासाठी बोलवले होते. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार एकूण ४३ मंत्री आज शपथ घेणार आहेत. ४३ नेत्यांना राष्ट्रपती भवनातून औपचारिकरित्या शपथ ग्रहण समारंभासाठी फोन आला आहे. भाजप ३२ मंत्रिपदे आपल्याकडे ठेऊ शकते. तर टीडीपी व जनता दलाच्या वाट्याला दोन-दोन मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे.
टीडीपी १६ खासदारांसह दुसरा आणि जेडीयू १२ खासदारांसह तिसरा सर्वात मोठा घटक पक्ष म्हणून उदयास आला. आजच्या शपथविधीत तेलुगू देसम पार्टी आणि जनता दल (युनायटेड) किंवा जनता दल (सेक्युलर) चे प्रत्येकी दोन सदस्य आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या इतर आठ घटक पक्षांचा प्रत्येकी एक सदस्य रविवारी नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. २०१४ नंतर पहिल्यांदाच ५४३ सदस्यांच्या लोकसभेत भारतीय जनता पक्षाला बहुमतासाठीचा २७२ जागांचा आकडा गाठण्यात अपयश आले.
आजच्या शपथविधी सोहळ्याच्या काही तास अगोदर तेलुगू देसम पक्षाचे नेते जयदेव गल्ला यांनी राम मोहन नायडू आणि चंद्रशेखर पेम्मासानी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्याची घोषणा केली. माजी खासदार गल्ला यांनी गुंटूरमधून डॉक्टर ते राजकारणी बनलेले पेम्मासानी आणि तीन वेळा खासदार आणि प्रशिक्षणाने इंजिनिअर राहिलेले राम मोहन नायडू यांचे अभिनंदन केले.
राजधानी दिल्ली येथे पंतप्रधान निवासस्थानी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या आमदारांना सकाळी ११ वाजता चहापानासाठी आमंत्रित केले गेले होते. त्यात जदयूचे लल्लन सिंह आणि रामनाथ ठाकूर, शिवसेनेचे प्रतापराव जाधव, राष्ट्रीय लोकदल (रालोद), जनशक्ती पार्टी (रामविलास) किंवा लोजपा (आरव्ही) चे चिराग पासवान, जनता दल (सेक्युलर) चे एचडी कुमारस्वामी, आजसू पक्षाचे चंद्र प्रकाश चौधरी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले, अपना दल (सोनेलाल) च्या अनुप्रिया पटेल आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे जीतनराम मांझी यांचा समावेश होता.
जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष असलेले राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह आणि बिहारचे माजी मंत्री आणि राज्यसभेचे सदस्य रामनाथ ठाकूर हे बिहारचे आणखी दोन मंत्री शपथ घेणार आहेत. राज्यसभेचे सदस्य जयंत चौधरी, चिराग पासवान आणि चंद्रप्रकाश चौधरी यांचा पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. रामदास आठवले आणि अनुप्रिया पटेल हे आधीच्या एनडीए सरकारमध्ये मंत्री होते.
नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळाची पहिली संभाव्य यादी :
१ नरेंद्र मोदी, भाजपा उत्तर प्रदेश वाराणसी
२ किंजरापू राम मोहन नायडू, टीडीपी आंध्र प्रदेश श्रीकाकुलम
३ चंद्रशेखर पेम्मासानी, टीडीपी आंध्र प्रदेश गुंटूर
४ प्रतापराव जाधव, शिवसेना महाराष्ट्र बुलढाणा
५ रामनाथ ठाकूर, JD(U) बिहार राज्यसभा खासदार
६ एच डी कुमारस्वामी, जेडी (एस) कर्नाटक मंड्या
७ अर्जुन राम मेघवाल, भाजपा राजस्थान बिकानेर
८ सर्बानंद सोनोवाल, भाजपा आसाम दिब्रुगड
९ जितन राम मांझी, हि.आवाम मोर्चा बिहार गया
१० सुरेश गोपी, भाजपा केरळ त्रिशूर
११ हरदीप सिंग पुरी, भाजपा पंजाब
१२ रवनीत सिंग, बिट्टू भाजपा पंजाब
१३ नितीन गडकरी, भाजपा महाराष्ट्र नागपूर
१४ पियुष गोयल, भाजपा महाराष्ट्र मुंबई उत्तर
१५ रामदास आठवले, RPI(A) महाराष्ट्र
१६ रक्षा खडसे, भाजपा महाराष्ट्र रावेर
१७ धर्मेंद्र प्रधान, भाजपा ओडिशा संबलपूर
१८ प्रल्हाद जोशी, भाजपा कर्नाटक धारवाड
१९ बंदी संजय कुमार , भाजपा तेलंगणा करीमनगर
२० हर्ष मल्होत्रा, भाजपा दिल्ली पूर्व दिल्ली
२१ श्रीपाद नाईक, भाजपा गोवा उत्तर गोवा
२२ अजय तमटा, भाजपा उत्तराखंड अल्मोरा
२३ एस जयशंकर , भाजपा गुजरात राज्यसभा खासदार
२४ मनसुख मांडविया, भाजप गुजरात पोरबंदर
२५ अश्विनी वैष्णव, भाजपा ओडिशा राज्यसभा
२६ निर्मला सीतारामन, भाजपा कर्नाटक राज्यसभा
२७ जितेंद्र सिंह, भाजपा जम्मू आणि काश्मीर उधमपूर
२८ शिवराज सिंह चौहान, भाजपा मध्य प्रदेश विदिशा
२९ चिराग पासवान, लोजपा (RV) बिहार हाजीपूर
३० राजनाथ सिंह, भाजपा उत्तर प्रदेश लखनौ
३१ ज्योतिरादित्य सिंधिया, भाजपा मध्य प्रदेश
३२ किरेन रिजू, भाजपा अरुणाचल प्रदेश ( पश्चिम )
३३ गिरीराज सिंह, भाजपा बिहार बेगुसराय
३४ जयंत चौधरी, आरएलडी उत्तर प्रदेश राज्यसभा
३५ अन्नामलाई , भाजपा तामिळनाडू
३६ एमएल खट्टर , भाजपा हरियाणा करनाल
३७ जी किशन रेड्डी, भाजपा तेलंगणा सिकंदराबाद
३८ चंद्रशेखर चौधरी, AJSU झारखंड गिरडीह
३९ जितिन प्रसाद, भाजपा उत्तर प्रदेश पिलीभीत
४० पंकज चौधरी, भाजपा उत्तर प्रदेश महाराजगंज
४१ . बीएल वर्मा, जेडीयू उत्तर प्रदेश
४२ लालन सिंग, एडी बिहार मुंगेर
४३ अनुप्रिया पटेल, भाजपा उत्तर प्रदेश झारखंड
४४ अन्नपूर्णा देवी, भाजपा झारखंड कोडरमा
४५ कमलजीत सेहरावत, भाजपा दिल्ली पश्चिम दिल्ली
४६ राव इंद्रजीत सिंग, भाजपा हरियाणा गुरुग्राम
४७ भूपेंद्र यादव, भाजपा राजस्थान राज्यसभा
४८ संजय सेठ, भाजपा झारखंड रांची
४९ कृष्ण पाल गुर्जर, भाजपा हरियाणा
५० मुरलीधर मोहळ, भाजपा महाराष्ट्र
