जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्य परिवहन आयुक्त विवेक भिमानवार यांनी राज्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे पदोन्नतीसह बदलीचे आदेश काढले असुन जळगाव प्रादेशिक परिवहन विभागाला नवीन आरटीओ अधिकारी मिळणार आहेत.
दरम्यान दीपक पाटील यांना जळगाव आरटीओ पदी पदोन्नती देण्यात आली असुन दीपक पाटील हे दि.१० सोमवार रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारतील. दीपक पाटील हे या आधी कोल्हापूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत होते.
दीपक पाटील यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर गडचिरोलीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांना पदोन्नती मिळाली आहे. चव्हाण हे मूळचे बुलढाणा येथील आहेत.
