DEVENDRA FADNAVIS offers to resign as Deputy CM : आमच्या जागा कमी होऊन जो पराभव झाला याची सगळी जबाबदारी मी स्वीकारतो. मी मान्य करतो की, मी यात कमी पडलेलो आहे. ती कमतरता पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकसभा २०२४ सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावे लागल्यानंतर आता भाजपाचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला पक्षसंघटनेत पूर्णवेळ काम करण्यासाठी सरकारमधील जबाबदारीतून मोकळं करा, अशी विनंती फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केली आहे.
मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा निर्णय आम्हाला मान्य नाही, त्यांनी सरकारमध्ये राहून पक्षसंघटनेला बळकटी द्यावी, अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी घेतली आहे. केंद्रीय नेतृत्व त्यांची ही विनंती मान्य करणार नाही, अशी आशा देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलून दाखवली.
राज्यात निर्माण झालेली राजकीय सकंटे अगदी लिलया पद्धतीने दूर करण्यात त्यांचा हाथखंडा आहे. जर फडणवीस यांची मागणी मान्य झाली तर त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री पदी कोणत्या सकंटमोचकाची वर्णी लागते हे येत्या काही दिवसांत कळणारच आहे.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानाबाहेर भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केली. फडणवीस यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
