Headlines
Home » शैक्षणिक » बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा इ.१०वी चा निकाल ९९.०२ टक्के

बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा इ.१०वी चा निकाल ९९.०२ टक्के

कजगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यभर घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात महात्मा गांधी विद्या प्रसारक मंडळ संचलित बबनबाई जवरीलाल यात हिरण माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कजगाव शाळेचा इयत्ता १० वी निकाल ९९.०२% लागला विद्यालयातून १०३ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये
१) महाजन देवेंद्र पंडित ९३.२०%
२) बोरसे तनिषा कांतीलाल ९०.६०%
३) पाटील गायत्री शरद ९०.६०%
४) पवार तृप्ती सोपान ८९% टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेत.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन मंगेश पाटील, सचिव रत्ना पाटील, उपाध्यक्ष दिनकर पाटील व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले. तसेच यावेळी विद्यालयात ऑनलाईन निकाल बघण्यासाठी विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक भूषण पाटील, कनिष्ठ लिपिक कमलेश पाटील, शिपाई पी.एच. झालसे, एस.जी.पाटील, वीरेंद्र देवरे उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के. पवार पर्यवेक्षक जी.टी. पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे गावतूनही अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!