पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इ.१२ वी च्या परीक्षेत तात्यासाहेब आर. ओ.पाटील विज्ञान, वाणिज्य व कला कनिष्ठ महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून दैदीप्यमान यश संपादन केले आहे. अद्वैत प्रवीण पाटील याने ८७.६७% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम, पार्थ संतोष पाटील याने ८६.६७% गुण मिळवून द्वितीय तर क्रिश नंदकिशोर जडे याने ८३.००% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या उत्तुंग यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सुर्यवंशी, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य प्रदीप सोनवणे, यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
