Home » जळगाव » जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात मतदानामुळे ११ ते १३ मे पर्यंत मद्यविक्री बंद

जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात मतदानामुळे ११ ते १३ मे पर्यंत मद्यविक्री बंद

जळगाव | दि. १० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ कार्यक्रमानुसार जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात १३ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया खुल्या, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मतदान कालावधी संपण्याच्या ४८ तास अगोदरपासून ते मतदान संपेपर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्री पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

निवडणूक कालावधीत मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी ४८ तासांपासून म्हणजेच ११ मे २०२४ रोजीच्या सायंकाळी ६ वाजेपासून, मतदानापूर्वीचा एक दिवस म्हणजेच १२ मे २०२४ आणि १३ मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मद्यविक्री बंद राहील. या आदेशाचे बंद कालावधीत उल्लंघन करुन मद्य विक्री करीत असल्याचे आढळून येणाऱ्या संबंधित परवानाधारकांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात येतील, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!