Headlines
Home » जळगाव » मेहरूण परिसरात महाविकास आघाडीची भव्य प्रचार फेरी ; नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

मेहरूण परिसरात महाविकास आघाडीची भव्य प्रचार फेरी ; नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव | दि.३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार करण पाटील (पवार) यांचा जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १४ व १५ भागात साईबाबा मंदीर मेहरुण येथून प्रचार दौऱ्याचा शुभारंभ केला. याप्रसंगी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वंदन करण्यात आले.

पुढे बिलाल चौक, पटेल गल्ली, जोशी वाडा, महाजन वाडा, तांबापुरा, मच्छी मार्केट, गवळी वाडा, फुकटपुरा, पिरजादे वाडा, शिरसोली नाका, राम मंदीर चौक, कुंभार वाडा, पाटील वाडा या भागांमध्ये भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीस ठिकठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसुन आला. तसेच प्रचार फेरीत असंख्य नागरिक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

प्रचार फेरीच्या अखेरीस शिरसोली मार्गावरील शामा फायरजवळ कॉर्नर सभा घेण्यात आली. यावेळी जळगाव शहराचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी, तसेच पदाधिकाऱ्यांनी सभेसाठी उपस्थित नागरिकांना संबोधित केले. तसेच महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार करण पाटील (पवार) यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार करून प्रचार दौऱ्याचा समारोप करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!