जळगाव | दि.२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुक्ताईनगर येथील साखर कारखाना या ठिकाणी महायुतीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बावनकुळे यांचे आगमन होताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाच्या उमेदवार रक्षा खडसे, केतकी पाटील व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
