Home » राष्ट्रीय » दिल्ली आणि नोएडातील ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; ईमेलमुळे उडाली खळबळ

दिल्ली आणि नोएडातील ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; ईमेलमुळे उडाली खळबळ

दिल्ली | दि.१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राजधानी दिल्ली आणि नोएडा येथील ८० हून अधिक शाळांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई-मेल प्राप्त झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. दिल्लीतील द्वारका येथील DPS तसेच मयूर विहारच्या मदर मेरी आणि नवी दिल्लीतील संस्कृति स्कूल व्यतिरिक्त नोएडा येथील DPS स्कूल यांसारख्या हायप्रोफाईल शाळांचा यामध्ये समावेश आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास हा ई-मेल पाठवण्यात आला होता. धमकीचा हा मेल मिळाल्यानंतर अनेक शाळांनी विद्यांर्थ्यांना क्षणाचाही विलंब न करता घरी पाठवून दिले

दरम्यान या परिस्थितीत अजिबात घाबरू नका, असे आवाहन पोलिसांनी सर्व पालकांना केले आहे. दिल्ली पोलिस, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि बॉम्बशोधक पथकाचे अधिकारी प्रत्येक शाळेमध्ये जाऊन तपासणी करत आहेत. सकाळपासूनच विद्यार्थ्यांना घरी लवकर घेऊन जा असे फोन अनेक शाळांतून आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पालकांनी शाळेत धाव घेतली आणि आपल्या मुलांना घरी घेऊन गेलेत.

दरम्यान हा ई-मेल कोणत्या आयपी ॲड्रेसवरून पाठवण्यात आला याबद्दल सायबर टीमकडून तपास करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल या तपासात व्यस्त आहे. बॉम्ब निकामी करणारी यंत्रणा शाळांच्या परिसरात तैनात करण्यात आली असुन आतापर्यंत पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. तसेच या प्रकरणावर गृह मंत्रालयाचेही लक्ष आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आवाहन केले आहे की, शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी पाठवणाऱ्या या मेलमुळे घाबरून जाण्याची गरज नाही. धमकीच्या या ईमेल मध्ये तथ्य नाही, हा एक फसवा मेल असू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा यासंदर्भात आवश्यक ती पावले उचलत आहेत.

दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी पोलिस आयुक्तांशी चर्चा करून परिस्थिति समजून घेत दिल्ली-एनसीआरमधील शाळांमध्ये बॉम्बच्या धमक्यांच्या मुद्द्यावर तपशीलवार अहवाल मागवला आहे. प्रत्येक शाळेच्या आवाराची तपासणी करून गुन्हेगारांची लवकर ओळख पटवा अशा सूचना दिल्ली पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!