जळगाव | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शिक्षण हक्क अधिनियमानुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची प्रक्रिया प्राथमिक शिक्षण विभागाने सुरू केली आहे. दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील बालकांच्या शैक्षणिक वर्ष २०२४- २५ मधील प्रवेशासाठी पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून (ता.१६) सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
दरवर्षी प्रमाणे सुधारित अधिसूचना दिनांक ०९/०२/२०२४ नुसार सन २०२४-२५ या वर्षांची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असून या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियअंतर्गत दि.१६/०४/२०२४ ते ३०/०४/२०२४ या कालावधीमध्ये पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता प्रक्रिया सुरु करण्यात येत असल्याची माहीती शरद गोसावी शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय पुणे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संकेतस्थळ:
https://rte25admission.maharashtra.gov.in
